प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई परिसरात पुनर्विकासाचे वारे जोरात वाहू लागले आहे. कित्येचे सोसायट्यांच्या पूर्णविकासाचे काम प्रगती पथावर आहे.असे असताना नवी मुंबईतील काही राजकीय घटकांकडून विकासकांना सहाय्याकांच्या व्दारे विकासकांना दम देने , अमुक एका बिल्डला काम द्या, आमच्याकडूनच रेती ,सिमेंट,स्टील,रेडिमिक्स माल घ्या, आमचाच पी.एम.सी. नेमा, अमुक याला टेंडर देऊ नका अशा विवीध प्रकारे धमकावले जात आहे तसेच सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवरही नानाविध प्रकारे दबाव टाकला जात आहे. नवी मुंबईत अशा प्रवृत्ती वाढल्या असून त्यामुळे सोसायटी पदाधिकारी तसेच विकासक यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा व संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिष्ट मंडळ घेऊन नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त येनपुरे तसेच नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली व विकासकांना व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे येथील काही राजकीय मंडळी त्रास देत आहेत याचा पाढा वाचला.यावेळी पोलीस आयुक्त येनपुरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, आमच्या क्राईम विभागात एक हौसिंग विभाग असून जर यापुढे कोणी अशा प्रकारचा दबाव आणला किंवा कॉल करून त्रास दिला तर आमच्याकडे त्या सोयासायटीकडून लेखी तक्रार नोंदवा त्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल व त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशाच प्रकारची तक्रारी निवेदन पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना दिले असून त्यांच्याशीही साधक बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी नवी मुंबईतील काही नागरी कामाचे निवेदनही डॉ.कैलाश शिंदे यांना देण्यात आले.
तर, टाऊन प्लॅनिंग विभागाला जर कोणी राजकीय घटकाने आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातुन फोनव्दारे दबाव टाकण्याचा किंवा फाईल अडवण्याचा कॉल केला तर अशा घटकांचे कॉल रेकॉर्ड करावेत व त्या फोन कॉलची रजीष्टरवर नोंद ठेवण्यात यावी अशी लेखी सूचनाही विजय नाहटा यांनी निवेदनात केली आहे.यावेळी शिष्ट मंडळांत उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, रोहिदास पाटील, रामशेठ वाघमारे, दिलीप घोडेकर, दीपक सिंग,संतोष दळवी, संजय कपूर,सलीम मुल्ला,विलास भोईर,संजय भोसले,शहर प्रमुख विजय माने,सह संपर्क प्रमुख सचिन कांबळे, ज्ञानेश्वर सुतार,विशाल कोळी,उपशहर प्रमुख आतिष घरत,नीलकंठ म्हात्रे,रामदादा कोळी,अविनाश गावडे,श्रीकांत हिंदलकर, उत्तर भारतीय सेनेचे जिल्हा संघटक कमलेश वर्मा, कामगार सेनेचे प्रमुख प्रदिप बी.वाघमारे, व्यापारी सेनेचे प्रमुख करण जैन,विभाग प्रमुख सुनील विपाणी,शाखा प्रमुख शरद एनपुरे, इत्यादी उपस्थित होते.


