1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे राष्ट्रीय कार्यकारिणीत अंतिम करण्यात आले असून, यास राज्य कार्यकारणी आणि संघाचाही होकार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त आहे. तर, ज्येष्ठ नागरिक वर्गात मोडणाऱ्या विद्यमान आणि इच्छुक आमदारांना “बस आता पुरे, पुढील पिढीला तुमच्या अनुभवाचे मार्गदर्शन करून, संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करा” अशी जबाबदारी देण्यात येणार आहे.

डिसेंबर 2024च्या महिन्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात शंभरीही गाठता येणार नसल्याचे वातावरण आहे. त्यामुळे जिंकण्याची 100% हमी असलेले उमेदवारच भाजपकडून मैदानात उतरवण्यात येणार आहेत. भाजपला राज्यात येनकेन प्रकारे सत्ता आणायची असल्याने, जिंकण्याची पूर्ण क्षमता असणाऱ्या एकाच परिवारात दोन उमेदवारी वेगवेगळ्या विधानासभेतून देण्याचेही भाजप श्रेष्ठी विचार करत आहेत.

तर, दुसरीकडे एक अथवा एकापेक्षा अधिकवेळा आमदार असलेल्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर जनतेमध्ये मत तयार झाले असते, ज्याचा फटका पक्षाला बसू नये म्हणून भाजप अश्यानाही सन्मानपूर्वक ‘शाल श्रीफळ’ देणार आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत भाजप आपली ‘यंग ब्रिगेड’ मोठ्या ताकदीनिशी उतरवणार हे जवळपास नक्की झाले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started