1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नेरूळ विभागात शिरवणेगाव, सेक्टर 1 येथील तस्लीम बिल्डींग, घर नं. 1063 ही तळमजला अधिक दोन मजली इमारत अतिधोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्याने तेथील रहिवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इमारतीत राहणा-या 12 कुटूंबातील 61 नागरिकांना मा.आयुक्त यांचे निर्देशानुसार विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे यांचेमार्फत गावदेवी समाजमंदिर, जुईनगर, से 23 येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. या नागरिकांच्या तात्पुरत्या निवा-यासह त्यांना जेवण व मुलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत असून त्यावरील नियंत्रणासाठी विभाग कार्यालयामार्फत 2 नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started