1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर से.12 येथे सिडको कालीन 40 वर्ष जूनी पावसाळी जलउदंचन केंद्राची जीर्ण झालेली इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन पंपींग मशीनरी बसविणे या कामामुळे सीबीडी बेलापूर परिसरातील पावसाळी कालावधीत काही भागात पाणी साचण्याची समस्या निकाली निघणार असून आनंददायी शहर निर्मितीच्या दृष्टीने ही महत्वाची सुविधा असल्याचे मत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केले. याकामी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर विभागातील से.12 येथे नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र बांधणे कामाचा भूमीपूजन समारंभ प्रसंगी आयुक्त आपले मनोगत व्यक्त्‍ करीत होते. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ-1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील व अजय संखे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, निलेश म्हात्रे, भरत जाधव, दिपक पवार, दिनानाथ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 


Design a site like this with WordPress.com
Get started