1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील बेलापूर विधासभेसाठी आगामी निवडणुकीत आमच्या उमेदवार मंदाताई म्हात्रेच असणार, असे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका माथाडी नेत्यांस ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे, आ. म्हात्रे यांचे तिकीट पक्षाकडून जवळजवळ अंतिम झाले आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे आमदार मुंबईत एकत्र जमले होते. यावेळी, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि स्वपक्षीय काही ज्येष्ठ आमदार तसेच आ. मंदाताई म्हात्रे चर्चा करत असताना, नवी मुंबईतील माथाडींचे नेते फडणवीसांना बोलले की, बेलापूर विधानसभेत म्हात्रे व नाईकांमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरू आहे. त्यामुळे, पक्षाला नुकसान नको म्हणून मला आगामी विधानसभेसाठी तिकीट द्यावे. यावर, “2024च्या विधानसभा निवडणुकीत आ. मंदाताई म्हात्रे याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असणार” असे ठणकावून सांगितले. ज्यामुळे, त्या माथाडी नेत्याचा चेहरा पडला जरी असला, तरी बेलापूरची जागा भाजपच्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांनाच पक्षाने अंतिम केली असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सदर घटनाक्रम विश्वसनीय सूत्रांकडून माहीत पडला, ज्याबाबत तसेच, आ. म्हात्रे यांना विचारले असता त्यांनीही यास दुजोरा दिला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started