प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधानसभेतील एका सत्ताधारी पक्षातील इच्छुक उमेदवाराने फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेली वाटप चळवळ आता प्रतिष्ठानने कॉपी केली आहे. त्यामुळे, शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची चांदी होत असल्याने ते सध्यातरी खुश आहेत.
पावसाळ्याची सुरुवात आणि 10वी, 12 वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व वह्या/फोल्डर वाटप सोबत वृक्षारोपणाचा उपक्रम शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या ‘विजय नाहटा फाऊंडेशन’कडून गेल्या वीसहून अधिक दिवसांपासून राबविला जात आहे. अश्याच उपक्रमाचा प्रारंभ सीबीडी-बेलापूर मधून आज भाजप जिल्हाध्यक्ष आणि बेलापूर विधानसभेतून इच्छुक उमेदवार संदीप नाईक यांनी केला आहे. त्यामुळे, उपक्रम कॉपी करण्याचा ट्रेंड सध्या गाजत आहे.

