प्रतिनिधी/पालिका प्रशासन : केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री तथा भारतातील दलित व बहुजनांचा बुलंद आवाज रामदास आठवले यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन विचाराधीन असल्याची माहिती भाजपचे मा. नगरसेवक तथा युवानेते विशाल डोळस यांनी दिली आहे.
NDA सरकारमध्ये सातत्याने केंद्रीय मंत्रीपद ग्रहण करणारे रामदास आठवले हे देशातील गोरगरीब, गरजू दलित व बहुजनांचा राष्ट्रीय आधारस्तंभ आहे. व त्याचा यथोचित सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा त्यांस केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन कायम करत आले आहेत. तर, “रामदासजी आठवले यांना केंद्रात मंत्रिपद प्राप्त होणे ही बाब आम्हा दलित व बहुजन समाजाची मान गर्वाने उंचावते, त्यामुळे लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री आठवले साहेबांचा जाहीर भव्य नागरी सत्कार सिवूडसमध्ये करण्याचे नियोजित आहे” असे मत विशाल डोळस यांनी व्यक्त केले आहे. डोळस यांच्या माध्यमातून होणारा आठवले यांचा भव्य नागरी सत्कार हा कोकण विभागातील प्रथम असल्याची चर्चा आहे.

