प्रतिनिधी/पालिका प्रशासन : युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नवी मुंबईतील काँग्रेसचे युवा नेते अनिकेत म्हात्रे इच्छुक असून, त्या दिशेने त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली असून, यागोदरही अनिकेत म्हात्रे यांनी विविध आंदोलने आणि मोर्चाच्या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध केले.
ऐरोली विधानसभेत सध्या आ. गणेश नाईक आहेत. परंतु, आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मतदानात मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना अल्पसंख्यांक, दलित आणि आदिवासी समाजाचे एकत्रित मतदान झाल्याने म्हस्के यांना प्राप्त मतदानात या विधानसभेतून घसरण झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अनिकेत म्हात्रे यांना ऐरोली विधानसभेतून उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याचे समजते.
तर, अनिकेत म्हात्रे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांचे व भाजपवर नाराज असे सर्व एकगठ्ठा मतदान म्हात्रेंच्या पारड्यात पडेल. तसेच, युवा विरुद्ध ज्येष्ठ लोकनेते यांच्यामध्ये थेट लढत होईल व ती रंगतदारही होईल.

