प्रतिनिधी/पालिका प्रशासन : इंटकचे ठाणे जिल्हा नेते आणि राजकारणातील पडद्यामागील चाणक्य अशी ओळख असणारे बेलापूर गावातील स्थानिक भूमिपुत्र व काँग्रेसचे युवा नेते मिथुन पाटील यांचे नाव नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे. ज्यामुळे, काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्यामध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
मिथुन पाटील यांनी NSUIचे नवी मुंबई अध्यक्षपद भूषवले असून, ज्यामध्ये उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांना गौरविले आहे. तर, पक्षाच्या कामगार युनियन असणाऱ्या इंटकच्या ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही मिथुन पाटील यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
तर, विधानसभा उमेदवारीबाबत मिथुन पाटील यांना संपर्क साधला असता, ‘महाविकास आघाडीला व काँग्रेसला सकारात्मक असे पोषक वातावरण आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास आणि वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्यास बेलापूर विधानसभेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा फडकविणार’ असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

