प्रतिनिधी/पालिका प्रशासन : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विशेषतः शहरी भागात होणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमात लागवड करण्यात आलेली झाडे/रोपे नक्की टिकतात का? यावर आता संशोधन समिती नियुक्ती करण्याची वेळ आली आहे.
विविध पर्यावरण संस्था आणि शहरी भागातील पर्यावरणवादी राजकीय नेत्यांकडून पर्यावरण दिनानिमित्त मोठ्याप्रमाणात वृक्षारोपणाचा प्रसिद्धी भंपक कार्यक्रम करण्यात येतो. आजतागायत सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ हजारोंच्या संख्येने वृक्षारोपण यांच्याकडून करण्यात आले आहे. परंतु, पर्यावरण दिन नंतर रोपण केलेली किती झाडे जंगली अथवा जगवण्यात आली, याबाबत यश प्रश्न उभा राहतो. कारण, जर का एवढ्या कालावधीमध्ये हजारो झाडे लावली तर, आतापर्यंत सदर शहरात त्या संस्था आणि राजकीय नेत्यांकडून लावण्यात आलेल्या झाडांची संख्या लाखोंच्या घरात असणे व ती दिसणे अनिवार्य आहे. परंतु, असे चित्र शहरात कुठेही निदर्शनास येत नाही.
पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठा गाजावाजा करून, लावण्यात आलेली रोपे/झाडे यांची विहित काळजी न घेतल्याने ते मृत्यू पावतात. परंतु, संस्था व नेत्यांचे फोटोसेशन आणि बातम्या प्रसिद्ध होण्याचा सोपस्कार पार पाडणे, इतकेच ध्येय उद्दिष्ट पर्यावरण दिन साजरा करण्याचे असते का? असा प्रश्न कायम ‘त्या’ शहरातील सामान्य जनतेला पडतो.

