प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीला शोभेल असे कृतकृत्य नवी मुंबई शिवसेनेकडून सुरु झाले असून, ठाणे लोकसभेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेश म्हस्के निवडून आल्यावर, शिवसेनकडून स्वार्थी रंग दाखवण्यास सुरुवात झाल्याची बाब जल्लोष निमंत्रणातून भाजपचे नाव गायब करून शिवसेनेने केली आहे.
ठाणे लोकसभेत नरेश म्हस्के यांचा विजय झाला असून, सदर विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज संध्याकाळी वाशी येथील छ. शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून निमंत्रण संदेश पाठवण्यात आला आहे. ज्यामधून, मोठ्या शिताफीने भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. मात्र, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, मनसे शहरप्रमुख गजानन काळे व शिवसेनेच्या सर्व जिल्हास्तरीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे. असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यावरून असेच दिसून येते कि, नवी मुंबईत शिवसेनेला आता भाजप आणि आ. गणेश नाईक यांची गरज नाही.


