1–2 minutes

पनवेल(पालिका प्रशासन) : पनवेल महानगरपालिकेचे नाव वापरुन काही अज्ञात व्यक्ती मार्फत ‘अभिनव उत्तम शिंदे’ या व्यक्तीच्या नावे पर्यवेक्षक ,संगणक ऑपरेटर पदाचे ऑफर देत असल्याबाबतचे दिनांक 31 मे रोजीचे एक खोटे पत्र समाजमाध्यमावर पोस्ट झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या अज्ञात व्यक्तीमार्फत अनेक गरजु व बेरोजगार व्यक्तींना असे खोटे पत्र देऊन त्यांचेकडुन पैसे मागणी करुन त्यांना लुबाडले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा अज्ञात व्यक्ती विरोधात महापालिकेच्यावतीने फौजदारी गुन्हा दाखल करणेकरीता पनवेल शहर पोलिस ठाणे येथे पत्र देण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत 41 संवर्गातील 377 पदांकरीता घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रम, प्रवर्गनिहाय, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सुची प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने दिनांक 16 मार्च पासुन सदर भरती प्रक्रिया सद्य:स्थितीत पुर्णत: स्थगीत आहे.

सर्व नागरीकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशांत रसाळ यांनी आवाहन केले आहे की, भरती प्रक्रिये अंतर्गत प्रसिध्द झालेल्या निवडसुचीत परीक्षार्थींनी आपल्या नावाचा समावेश असल्याची खातर जमा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर करावी. तसेच ही भरती प्रकिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडत असल्याने अशा खोट्या प्रलोभनाला बळी पडु नये .


Design a site like this with WordPress.com
Get started