1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गॅरेज आणि कार ऍक्सेसरीजच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांची कोणतीही माहिती दुकान मालक तसेच स्थानिक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने, अपराधी प्रवृत्ती असणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. अश्या ठिकाणी कामाला लागून एकप्रकारे समाजासाठी या कामगारांमुळे सामाजिक धोका निर्माण होत आहे. त्यामुळे, या कामगारांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (character verification certificate) स्थानिक पोलीस स्टेशनला दुकान मालकांनी जमा करावे. अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कार ऍक्सेसरीज आणि गॅरेजमध्ये काम करणारे कामगार यांचा कोणताही पुरावा दुकानदार अथवा स्थानिक पोलीस स्टेशनला जमा नसतो. त्यामुळे, सभोवताल भागाची रेकी करून अथवा काम करत असलेल्या ठिकाणीच साथीदारांच्या मदतीने डल्ला मारून पळून जाण्याच्या अपराधिक घटना सध्या वाढत आहेत. यावर, उपाय म्हणजे अश्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट अनिवार्य केल्यास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चोरी व अपराधीक घटनांवर कायद्याचा वचक बसेल. आणि, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखता येईल.

लॉजिंग – बोर्डिंगमध्येही अशीच परिस्थिती..!

शहरात मोठ्या संख्येने बेकायदेशीर व अनधिकृतपणे लॉजिंग-बोर्डिंग चालविले जातात. याठिकाणी काम करणारे कामगारही गुंड तसेच गुन्हेगारी मनोवृत्तीचे असल्याचे समजते. त्यामुळे, हे कामगार अनेक गुन्ह्यांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहेत. येथील कामगारांचेही चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेटची स्थानिक पोलीस स्टेशनने मागणी करणे आवश्यक आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started