प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ठाणे लोकसभा क्षेत्रात महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांचे मतदान चिन्ह धनुष्यबाण सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये, दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक सर्वांत आघाडीवर असून, बाळासाहेबांच्या धनुष्यबाण व्यतिरिक्त इतर कोणतेही बटण दाबण्याची मुभा नियती देत नाही. अशी गंभीर चर्चा जोर धरू लागली आहे.
ज्या राजन विचारे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये ठाणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे व मीरा-भाईंदर या महानगरपालिकांमधील केंद्रीय प्रश्नासमस्या सोडविण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अश्या निष्क्रिय उमेदवाराला मतदान देवून बाळासाहेबांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या उद्देशाला तिलांजली देण्यासारखे ठरेल. त्यामुळे, बाळासाहेबांच्याच ‘धनुष्यबाण’ला मतदान करून हिंदुत्व जपून भारताला विकासाच्या रथावर स्वार करून महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुनः पंतप्रधान करणे व्यवहारिक राहील. असे मत तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठांनी गाठीशी बांधले असल्याने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचे एकंदरीत सार्वजनिक चर्चेतून दिसून येत आहे.

