प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सानपाडा येथील शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब यांच्या निवासस्थानी चर्मकार समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांनी श्री संत रोहिदास सामाजिक संस्था नवी मुंबई या संस्थेच्या वतीने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना पाठिंबा जाहीर केला. श्री संत रोहिदास सामाजिक संस्था नवी मुंबई या संस्थेच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश म्हस्के यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र शिवसेना उपनेते श्री विजय नाहटा साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष भानुदास राजगुरू, उपाध्यक्ष सुरेश खाडे, संघटक सुभाष घोडके, सचिव राजाराम खाडे, उपसचिव महादेव गायकवाड, खजिनदार विना शिंदे, आणि चर्मकार समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी, श्री संत रोहिदास सामाजिक संस्थेच्यावतीने विजय नाहटा साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या वतीने २५ ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना संपूर्ण चर्मकार समाजाचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला. यावेळी विजय नाहटा साहेबांनी चर्मकार बांधवांच्या अनेक समस्या समजून घेत,येणाऱ्या काळामध्ये गटई कामगार सहित चर्मकार बांधवांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने,कमलेश वर्मा (उत्तर भारतीय सेना प्रमुख) युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख साईनाथ वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

