1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणि विशेषतः गावठाण विभागात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत अथवा सुरू आहेत. गरजेपोटीच्या नावाखाली उंच ईमारती उभारून त्यातील खोल्या, गाळे विकल्या जात आहे. तर, स्वस्तात रहिवाशी आणि वाणिज्य स्वरूपातील मालमत्ता मिळत असल्याने नागरिकही त्या खरेदी करत आहे. मात्र, अश्या अनधिकृत बांधकामे उभारत असतानाच त्यांवर तोडक कारवाईचे न्यायालयीन आदेश आणणाऱ्या महापालिकेच्या पॅनलवरील वकिलांना दूर करण्याचे प्रयत्न वॉर्ड ऑफिस अधिकारी आणि विधी विभाग एकत्रितपणे करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गरजेपोटीच्या नावाखाली अनधिकृत ईमले उभारणीच्या विरोधात पहिल्या स्तरावर दिखाऊ प्रशासकीय कार्यवाही करण्यात येते. सदर, कार्यवाहीचे दुसरे सत्र न्यायालयीन असते. महापालिकेच्या पॅनलवर असणारे वकील हे अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर पद्धतीने मोठ्या शिताफीने न्यायिक लढाई लढून सदर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश आणतात. परंतु, अश्या तोडक आदेशांमुळे विशेषतः वॉर्ड ऑफिसर स्तरावरील व्यवहार बिघडतो. त्यामुळे, असे न्यायालयीन आदेश आणणारे वकील नको म्हणून, वॉर्ड ऑफिसर आणि विधी विभाग अश्या लढवय्या आणि अभ्यासू वकिलांना अनधिकृत बांधकांमांची प्रकरणे देण्याचे टाळत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started