पनवेल/पालिका प्रशासन : शासनाकडून शैक्षणिक वर्ष 2023_24 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पनवेल महानगरपालिका शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त भारत राठोड , शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, अधिक्षक कीर्ती महाजन यांनी केलेल्या वेळोवेळी केलेल्या सुयोग्य नियोजनानुसार सर्व शाळेत शिष्यवृत्ती परीक्षार्थींची तयारी करण्यात आली होती.
या परीक्षेचा दिनांक 30 एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला असून महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 दि. बा.पाटील शाळेतील विद्यार्थी नैतिक राघो पाटील, शाळा क्र. 2 हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेतील कु.आशियाना मोहम्मद हुसेन अन्सा, शाळा क्र. 5 मोठा खांदा जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेतील कु. ऋषिकेश महादेव नागरगोजे, मनपा शाळा क्रमांक 7 तक्का मराठी शाळेतील कु. प्रिन्स जगत सोनकर व श्रवण मनोज बहिरा हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळा क्रमांक 1 दि. बा.पाटीलच्या पाचवीच्या वर्गशिक्षिका वैशाली चेतन पाटील, मुख्याध्यापिका अनुपमा अनिल डामरे, मनपा शाळा क्र. 2 हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेतील वर्गशिक्षक कमल देविदास तायडे व मुख्याध्यापक वाल्मीक नथू राठोड, मनपा शाळा क्र. 5 मोठा खांदा जीवन शिक्षण विद्या मंदिरच्या पाचवीच्या वर्गशिक्षिका शुभांगी गोरखनाथ मनपा शाळा क्रमांक 7 तक्का मराठी शाळेतील वर्गशिक्षक वैभव चंद्रकांत पाटील तसेच मुख्याध्यापिका संध्या सुनील सावळे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व मुख्यध्यापकांचे आयुक्तांनी अभिनंदन केले. शैक्षणिक वर्ष 2024 _25 मध्ये 100% विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसवून जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

