प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असणारे डॉ. संजीव नाईक यांना डावलून, याठिकाणी शिंदेसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने, नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. व यामध्ये विशेष गोंधळ घालणारे आघाडीवर असणारे तेच आहेत, ज्यांनी 2019मध्ये मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी गणेश नाईकांवर विशेष दबाव आणला होता.
ठाणे लोकसभेसाठी डावलल्यामुळे भाजप आणि नाईक समर्थकांमध्ये विशेष नाराजी पसरली असून, त्यांनी राजकीय गोंधळ घालत राजीनामा अस्त्र, प्रदेश कार्यालयात जाऊन बावनकुळे यांची भेट व प्रदेश कार्यलयातच ठिय्या आंदोलन करत, डॉ. संजीव नाईकांना उमेदवारी जाहीर करावी यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणत आहेत.
मात्र, या सर्वात तेच जास्त पुढे-पुढे करत बंडखोरीची भाषा करत आहेत, ज्यांनी 2019 साली भाजपच्या मोदी लाटेसमोर आपण टिकाव धरू शकणार नाही म्हणून, नाईकांना तात्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्यास भाग पाडले. व आताच्या घडीला नाईकांवर अन्याय झाल्याची गळा सुकत पर्यँत आरडाओरड करीत आहेत. तर, गणेश नाईक राष्ट्रवादीत थांबले असते तर त्यांना बदलेल्या राजकीय समीकरणामुळे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असते व तदनंतर आता अजित पवार गटासोबत आले असते तर पुन्हा कॅबिनेट मंत्री व ठाण्याचे पालकमंत्रीपद कायम राहिले असते. परंतु, स्वतःच्या वॉर्डात घड्याळावर जिंकून येणार नाही त्यामुळे त्या माजी नगरसेवकांनी नाईकांना मनगटातील घड्याळ सोडण्यास भाग पाडून, हातात कमळ घेण्यास लावले. ज्याचा पहिला फटका विधानसभेत एकच जागा, पाच वर्षे कोणतेही मंत्रिपद नाही व आता खासदारकीची उमेदवारही हातची निसटली. आणि हे सर्व त्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाच्या अट्टहासमुळे घडले असल्याचे वेगळे सांगण्यास नको.

