1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : शेवटच्या क्षणी ठाणे लोकसभेची उमेदवारी शिंदेंच्या शिवसेनेकडे वर्ग झाल्याने, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे यांसोबतच बाजूच्या मावळ आणि कल्याण ग्रामीण लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या मतदार वर्ग, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, याचा फटका शिंदेसेनेला ठाणे सहित मावळ आणि कल्याण ग्रामीण लोकसभेत बसण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे, या तिन्ही लोकसभेतील महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याची वाट सोपी होणार आहे.

ठाणे लोकसभेत सहापैकी 4 आमदार भाजपचे असताना, व तांत्रिक व शास्त्रीय सर्व्हेनुसार ठाणे लोकसभेतून भाजपचा एकतर्फी विजय निश्चित असल्याने ज्येष्ठ भाजप नेते व आमदार गणेश नाईक, तद्नंतर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, ठाण्याचे आमदार संजय केळकर, भाईंदरच्या आमदार गीता जैन, माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे इत्यादी मातब्बर नावे खासदारकीसाठी इच्छुक होती. मात्र, स्वतःचा रहिवास असणारा मतदारसंघ अर्थात बालेकिल्ला मित्र पक्षाकडे जाऊ नये याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्षेला पेटले होते. ज्यासमोर प्रदेश व राष्ट्रीय भाजप नेत्यांना हार पत्करावी लागली. आणि, शिंदेंसेनेकडून नरेश म्हस्के यांची उमेदवारी निश्चित होत जाहीर करण्यात आली.

तर, भाजपला उमेदवारी न मिळाल्याने निवडणुकीसाठी पूर्व तयारी झालेल्या नाईक समर्थक (यांसाठी दुसरा याआधी बेलापूर मतदार संघातून नाईक परिवाराला 2019चे विधानसभा उमेदवारी नाकारण्यात आली होती) व भाजपच्या मतदार आणि पदाधिकारी – कार्यकर्त्यांसाठी हा जबर राजकीय धक्का असल्याने, आता बहुतांश महायुतीच्या उमेदवार निवडणूक प्रचारापासून स्वतःला दूर ठेवतील आणि 20 मे लाही मतदान शिंदेंसेनेच्या उमेदवाराला करणार नाही ही बाब निर्धारित आहे.

तसेच, मावळ आणि कल्याण ग्रामीण लोकसभेतून उमेदवारी आधीच शिंदेंसेनेला जाहीर असल्याने, ठाणे लोकसभा भाजपकडेच येणार अशी शाश्वती होती. परंतु, तसे न घडल्याने भाजपचे पदाधिकारी अनुक्रमे नरेश म्हस्के (ठाणे), श्रीरंग बारणे (मावळ) आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण ग्रामीण) या तीनही लोकसभेत क्रॉस मतदान करून दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी मार्ग सुकर करून देतील. ज्याला, कारणीभूत असेल भाजपला न सोडलेली ठाणे लोकसभा..!


Design a site like this with WordPress.com
Get started