1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ठाणे लोकसभेची उमेदवारी शिंदेसेनेने ऐनवेळेस उच्चस्तरीय राजकीय खेळी व ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून भाजपकडून ओढून घेवून, एका दृष्टीने लोकनेते गणेश नाईक व त्यांच्या परिवाराच्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेला शह देत अप्रत्यक्षपणे का होईना खच्चीकरण केले आहे. ज्याची जबर किंमत शिंदेंसेनेला विद्यमान लोकसभा निवडणुकीसोबत आगामी विधानसभा आणि भाजप विशेषतः नाईकांचा प्रभाव असणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, मिराभाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये व्याजासाहित चुकवावी लागणार आहे. तसेच, स्वपक्षातील काही आमदार व नेत्यांनी नाईक परिवारातील उमेदवारीला विरोध दर्शविन्यामध्ये अग्रेसर भूमिका निभावली होती. त्यांच्या पुढील पिढ्या राजकीय क्षेत्रातून कायमस्वरूपी वजा होतील, ही बाब वेगळे सांगण्याची गरज नाही.


Design a site like this with WordPress.com
Get started