1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नेरुळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूस खाजगी बिल्डरकडून ईमारत उभारणीसाठी सुरु असणाऱ्या बांधकामासाठी करण्यात सदर बिल्डरकडून २३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे त्यातील दगड उडून ३७ वर्षीय महिलेच्या डोक्यात आपटल्याने डोक्याला दुखापत आणि  डोक्यातून रक्तस्त्राव होऊन टाके पडले होते. ज्याबाबत, नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३३७ अंतर्गत गुन्हा (FIR ) नोंद करण्यात आला आहे.


परंतु, पोलीसांमार्फत नोंदविण्यात आलेल्या FIRमध्ये ईमारत उभारणाऱ्या आणि त्याच्या बांधकामासाठी ब्लास्ट करणाऱ्या व त्यामुळे महिलेला झालेल्या दुखापत/रक्तस्त्राव व टाके यांसाठी जबाबदार असणाऱ्या संशयित आरोपी अर्थात त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणाऱ्या मालकाचे नाव पोलिसांनी नमूद केलेलं नाही. यायर्थ, सदर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मालकाला वाचविण्याचा प्रयत्न नेरुळ पोलीस करीत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर, प्रत्येक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटवर ज्या-त्या बिल्डींग उभारणाऱ्याचे नाव अथवा साईट ऑफिसमध्ये त्याबाबतची माहिती उपलब्ध असते. परंतु, पोलिसांना प्रकरण दाबायचेच असेल तर प्रक्रिया कशी पार पाडली जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नोंदविण्यात आलेला बिन संशयित आरोपीच्या नावाचा FIR आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started