प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर गावातील शहाबाज गाव याठिकाणी घटीत, डिपॉझिटची उरलेली रक्कम मागितली म्हणून मारहाण झालेल्या ‘त्या’ पिडीत महिलेने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन करत पोलीस तिला व तिच्या कुटुंबियांच्या जीविताला, मारहाण करणाऱ्या अमीर अन्सारी व त्याच्या कुटुंबीयांकडून धोका असल्या कारणाने, पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
NRI सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत FIR क्रं. 113/24 अंतर्गत गुन्हा नोंद असलेल्या प्रकरणातील आरोपी अमीर अन्सारी व त्याचे कुटुंबीय/नातेवाईक हे महिला राहत असणाऱ्याच इमारतीत वास्तव्यास आहेत. महिलेला मारहाण करणारा अमीर अन्सारी जरी पलिसांच्या ताब्यात असला तरी त्याचे कुटुंबीय हे बिल्डर व डेव्हलपर असल्याने ते पैसा आणि राजकीय शक्तीचा आयोग्य पद्धतीने वापर करत, मारहाण झालेल्या महिला व तिच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मानसिक अथवा शारीरिक त्रास देण्याची शक्यता आहे. अशी भीती असल्याने फिर्यादी पिडीत महिलेने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यांकडे स्वतः व तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे याकरिता लेखी निवेदन दिले आहे.
महिला आमदारांचे दुर्लक्ष(?)
महिला अत्याचाराची एवढी मोठी घटना मतदार संघात घडलेली असताना व पीडित महिलेचे घर हाकेच्या अंतरावर असूनही, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक व डॅशिंग महिला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ‘पीडित’ महिला अथवा तिच्या कुटुंबियांची साधी विचारपुसही केली नाही. त्यामुळे, आमदारांच्या अश्या भूमिकेबाबत सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिडीत महिलेभोवती सामाजिक संस्थांनी उभे केले कायदेशीर ‘मदतीचे कवच’
विश्वहिंदू परिषद, बजरंग दल आणि भारत रक्षा मंच इत्यादी संस्थांनी पीडितेला योग्य व अपेक्षित न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी, याकरिता कायदेशीर मदतीचे कवच उभे केले असून, ज्याचा सर्वस्वी आर्थिक भार सदर संघटना एकत्रितपणे उचलत आहेत.

