1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर सेक्टर – ११ येथील जमीन गुरु रियल्टी प्रा.लि.चा मालक रणजीत शर्मा याच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याबाबत सीबीडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, मनसेच्या महिला नेत्या डॉ. आरती धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यानी शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तरुणीला गुन्हा नोंदविण्यासाठी सहकार्य केले आहे. तसेच, पुढील कायदेशीर लढाईत मनसे नवी मुंबई त्या तरुणीच्या सोबत उभे राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

फिर्यादी तरुणीला संशयित/आरोपी रणजित शर्मा सतत कोणतेही कारण काढून स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वेळोवेळी तरुणीला एकटीच त्याचे केबिनमध्ये बोलवून थांबवून घेत व विनयभंग करण्याचे उद्देशाने मुलीला एकटक पाहून सभोवताली फिरून स्पर्श करण्याचा प्रत्यत्न करत असे. त्यांचे या वर्तनामुळे सदर तरुणीच्या मनामध्ये खुपच लज्जा निर्माण होत असे. परंतु नोकरीची खुप आवश्यकता असल्याने काही दिवसात सगळे सुरळीत होईल, या आशेने तरुणीने सर्वकाही सहन केले.

मात्र, दोन दिवसांपूर्वी सदर तरुणीला संशयित/आरोपी रणजीत शर्मा याने, तिच्या “मागील सर्व सुट्टया माफ करणार, पगार वाढवणार, तुला काहीही कमी पडू देणार नाही, तुझे सर्व स्वप्न पूर्ण करणार” असे अश्लील पद्धतीने बोलत लालूच दाखवून, लज्जास्पद वक्तव्ये केली. तसेच तरुणीने त्याचे न ऐकल्यास संशयित/आरोपी रणजीत शर्मा याने तरुणीला नोकरीवरून काढून टाकण्याचा धमकी देखील दिली. तसेच, संशयित/आरोपी रणजित शर्मा याने तरुणीसोबत आधीदेखील अपकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. या अनुषंगाने, अपकृत्य रणजीत शर्मा याच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३५४, ५०९, आणि ५०६ अंतर्गत सीबीडी पोलीस ठाणे येथे आज १७ एप्रिल रोजी गुन्हा F.I.R. नोंदीत करण्यात आला आहे. तर, तरुणीने निर्भया बनून स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वेळीच आवाज उठवल्याने आणि तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवल्याने तरूणीचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started