1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालक हे वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असलेचे निदर्शनास आले होते. त्या अनुशंगाने नवी मुंबई वाहतुक विभागाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रिक्षा युनियन नेते तसेच रिक्षा मालक/चालक यांचे एकत्रित मिटींग आयोजित करून सर्व रिक्षा चालक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे बाबत वेळोवेळी सुचना/आवाहन केलेले होते.

तरीही नवी मुंबई कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालक हे वाहतुकीचे नियम न पाळता नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असलेचे तसेच भाडे नाकारत असले बाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने 10 एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवून १३८ एवढया रिक्षा चालकांविरुध्द कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तसेच यापुढेही अशा वाहतुकीचे नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारणे रिक्षा चालविणारे तसेच भाडे नाकारणारे रिक्षा चालक/मालक यांचेवर वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, नवी मुंबई पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त वाहतुक, नवी मुंबई तिरुपती काकडे व सहायक पोलीस आयुक्त, सुनिल बोंडे यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई वाहतूक विभागाकडून करण्यात आली.

तर, रिक्षा मालक/चालक यांनी त्यांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे, व वाहतुक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतुक विभागास सहकार्य करावे. असे आवाहन वाहतूक पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started