प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सकल हिंदू समाज फाऊंडेशनतर्फे आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या हस्ते ‘महिला सशक्तीकरणाची गुढी’ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या हर्षोल्लासात उभारण्यात आली. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, शिवसेना जिल्हासंघटक सरोज पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पूनम पाटील, मा. नगरसेविकेला शैला नाथ, मा. नगरसेविका स्वाती गुरखे-साटम, मा. नगरसेविका सुरेखा नरबागे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बेलापूर तालुकाध्यक्ष अस्मिता पाटील, मनसे शहराध्यक्षा आरती धुमाळ, समाजसेविका रुक्मिणी पळसकर, समाजसेविका ज्योती खराडे, न्युज मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षा दिपाली घोलप इत्यादी स्थानिक दिग्गज महिला नेतृत्व हस्ते गुढी उभारण्यासाठी उपस्थित होते.
तर, आयोजित शोभायात्रेत श्रीराम रथ, ढोलताशा पथक, लेझीम पथक प्रात्यक्षिके आणि खास आकर्षण म्हणजे मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सदर शोभायात्रेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नेते विजय माने, नेते दिलीप घोडेकर इत्यादींनी भेट दिली.
तसेच आयोजित शोभायात्रेत ज्येष्ठ मा. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सि.व्ही. रेड्डी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील, समाजसेवक डॉ. आशिष शिरुरकर, नाना कुदळे, ऍड. संतोष पळसकर, उद्धव खराडे, अभयचंद्र सावंत, अशोक नरबागे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय भुर्के व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी एकमेकांस हिंदवी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सकल हिंदू समाज फाऊंडेशनतर्फे आयोजित गुढीपाडवा शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेंद्र भोसले, सचिव विनय कोळपकर, खजिनदार सिद्धांत पाटील, कमिटी सदस्य सर्वस्वी मंदार घोलप, निलेश पडये, शिवम गायकवाड, दर्शन आचरेकर इत्यादींनी परिश्रम घेतले. तर, पत्रकार सुदिप घोलप यांनी प्रमुख सल्लागाराची जबाबदारी निभावली. तसेच, डॉ. विवेक येळगावकर यांचे आयोजनासंबंधित विशेष मार्गदर्शन लाभले. शोभायात्रा समाप्तीनंतर अलबेला हनुमान मंदिरात सामुहिक आरती करण्यात आली व तद्नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.


