प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई शिवसेना जिल्हासंघटक तथा माजी ज्येष्ठ नगरसेविका सरोज रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तकन्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून घरेलू कामगारांच्या कल्याणास चालना देण्यासाठी, तसेच त्या कामगारांना विविध वित्तीय लाभ देण्यासाठी, ‘घरेलू कामगार कल्याण मंडळा’च्या योजनांचे अर्ज भरून घेण्याच्या शिबिराचे आयोजन सरोज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. याप्रसंगी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली.
याप्रसंगी, उपस्थित महिला घरेलू कामगारांना योजनेची माहिती सांगण्यात आली. तसेच, या योजनेत नोंदणी केल्यास घरेलू कामगाराचा अपघात घडल्यास तत्काळ सहाय्य पुरविणे.; त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे.; लाभार्थीच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे.; महिला लाभार्थीकरिता प्रसुती लाभाची तरतूद करणे.; लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.; मंडळाने वेळोवेळी निश्चित केलेले असे इतर लाभ.; राष्ट्रीय स्वास्थ्य भीमा योजना, इत्यादींची इतंभूत माहिती देण्यात आली.




