1–2 minutes

प्रतिनिधी/ पालिका प्रशासन : ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी गेली दहा वर्षे मतदार संघात निष्क्रियता दाखवल्याने त्यांवर मतदारांसोबतच महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही नाराज आहे. तर, खा. विचारे यांना गेल्या पाच वर्षातही केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात मतदार संघात अपयश आल्याने आम्ही कोणत्या तोंडाने मतदारांना मत देण्यासाठी आवाहान करणार? असा प्रश्नही महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसमोर ‘आ’ वासून उभा आहे. याचा फटका राजन विचारे यांना निवडणुकीत नक्कीच बसणार असल्याचे निदर्शनास पडत आहे.

२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी, भाजारतीय जनता पार्टी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेच्या प्रभावामुळे राजन विचारे एकहाती विजय संपादन करू शकले होते. मात्र, मिळालेल्या लोकसेवा करण्याच्या संधीचे सोने करण्याऐवजी विचारे यांनी आपली खासदारकी मिरवण्यातच पूर्णवेळ खर्ची केला. ज्यामुळे, केंद्राच्या योजना मतदार संघात राबविण्याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. ज्यामुळे, आताच्या निवडणुकीत राजन विचारे यांच्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर मते देण्यासाठी आवाहन करणार, या पेचात महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व समर्थक मतदार पडले आहेत.


Design a site like this with WordPress.com
Get started