प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार तथा रायगड ऑब्झरवर वृत्तपत्राचे संपादक तसेच पालिका प्रशासन वृत्तसमूहाचे मार्गदर्शक पत्रकार क्षेत्रातील गुरुवर्य पदवी प्रदान एकमेव पत्रकार विश्वरथ नायर यांना आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आन शनिवार ३० मार्च रोजी ठाण्यात पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, संपादक आणि छायाचित्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये नवी मुंबईतून ज्येष्ठ पत्रकार तथा रायगड ऑब्झरवरचे संपादक विश्वरथ नायर, कोकण सकाळचे संपादक राजाराम माने , भिवंडी येथील कुसुमताई देशमुख, तसेच अंबरनाथ, मीरा-भाईंदर, कल्याण येथील पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे.
ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता पत्रकारांचा मेळावा होणार आहे. याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कारासह मान्यवर गौरवमूर्तीचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर, सदर कार्यक्रमासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले संपादक कैलाश म्हापदी व आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य अधिस्वीकृती आणि जिल्हा समितीवर निवड झालेले ठाणे जिल्ह्यातील पत्रकार सदस्य, दिलीप सपाटे, विनोद जगदाळे,जयेश सामंत आणि संजय पितळे तसेच जिल्हा समितीवरील विभव बिरवटकर यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय साळुंखे यांनी दिली आहे.

