प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई भाजपचा धडाकेबाज जिल्हास्तरीय नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गळाला लागला असून, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून उद्या 28 मार्च रोजी हा युवानेता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तुर्भे विभागातील हा युवा नेता सातत्याने पर्यावरण संरक्षणासाठी आणि प्रदूषणाच्या विरोधात लढा देत आला आहे. तसेच, माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या अत्यंत जवळचा मानला जातो. परंतु, विद्यमान जिल्हाध्यक्षांकडून राबविण्यात येणाऱ्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दूर करण्याच्या प्रोपौगंडाला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून समजले. तर, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे अंतिम करून हा नेता उद्या शिवसेना उबाठामध्ये प्रवेश करणार असून, पक्षाची नवी मुंबई जिल्हास्तरीय जबाबदारी त्यांना देणार असल्याचेही वृत्त आहे.

