प्रतिनिधी/पालिका प्रशासन : लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी जर खासदरकीचा उमेदवार नवी मुंबईतील भूमिपुत्र नसेल तर तो राजकीय पक्षाला नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील मतदार नाकारण्याची शक्यता आहे.
ठाणे लोकसभा क्षेत्रात नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर अश्या तीन महानगरपालिका क्षेत्र येतात, परंतु इतिहास पाहता बहुतांश वेळा लोकसभेसाठीचा उमेदवार कायम ठाणे शहरातूनच राजकीय पक्षाने निवडला आहे. यावेळीही, मुख्य राजकीय पक्ष जसे भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट)/काँग्रेस इत्यादींनी ठाणे शहरातूनच उमेदवार देण्यासाठी पसंती दाखवत आहेत. ज्यामुळे, नवी मुंबईतील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याचा फटका मतदानाच्या दिवशी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

