नवी मुंबई/पालिका प्रशासन : शहर विकासाच्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे लोकसभा निवडणूक घोषणा पत्रासाठी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे घोषणापत्र नागरिकांच्या मौलिक सूचनांसह तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सूचनापेटी अभियान भाजपतर्फे सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्मितीचे स्वप्न पाहिले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाची दमदार वाटचाल सुरू आहे. विकसित भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. नवी मुंबईकर नागरिक सुजाण आणि अभ्यासू आहेत. महिला, युवा, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, व्यावसायिक, प्रकल्पग्रस्त, उद्योजक, दिव्यांग, कामगार, प्रवासी अशा विविध स्तरातील नागरिकांनी त्यांना अपेक्षित नवी मुंबईतील विकास प्रकल्प, सेवा सुविधांबद्दल आपल्या सूचना नोंदविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे.
मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या सूचना या सूचनापेटीत टाकल्या आहेत. नवी मुंबईतील विविध ठिकाणी या सूचनापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या सूचना पेट्यांमध्ये नागरिक निवडणूक घोषणापत्रासाठी सूचना टाकू शकतात. नमो अँपच्या माध्यमातून किंवा मोबाइल नंबर 9090902024 वर मिस्ड कॉल देऊन देखील सूचना सादर करता येणार आहेत.

