1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : राज्याचे मुख्यमंत्री पद जरी एकनाथ शिंदेंकडे असले तरीही त्यांच्या शिवसेनेची सर्व दोऱ्या मात्र भाजपच्या हातात असल्यानेच अद्यापही शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठीच्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली नाही. तर, भाजपच्या उमेदवारी यादीनंतरच शिवसेना आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.

लोकसभा 2024च्या निवडणुकांचे राजकीय पक्षांनी बिगुल वाजवले आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. मात्र, अद्यापही CM पदावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एकाही लोकसभा उमेदवाराचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तर, भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची गोची होत असून, भाजपच्या यादी प्रसिद्धीनंतरच शिवसेना भाजपने उपकारार्थ सोडलेल्या जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started