काँग्रेस पक्षाने ज्या कुटुंबाला वा नेत्याला भरभरून राजकीय ताकद आणि पदे दिली. अश्यानी काँग्रेसचा हात तर सोडलाच सोबत त्या-त्या प्रदेशातील काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंगही लावला. अश्यामध्ये, काँग्रेसच्या संस्कृतीनुसार दुर्लक्षित राहिलेलया पुढच्या फळीवर अर्थात या नेत्यांवर आता महाराष्ट्र काँग्रेसची मदार आहे.
आक्रमक महिला नेतृत्व ‘आ. प्रणिती शिंदे’
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर होती असं विधान केलं होतं. सोलापूरच्या लोकसभेची गणित पाहता भाजपला देखील प्रणिती शिंदे सारख्या उमेदवारांची गरज असल्याने प्रणिती शिंदे भाजपमध्ये जातील असा चर्चा घडत असतात. मात्र प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार नाही असं आजही सोलापूर काँग्रेसचे कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगतात. प्रणिती शिंदेंमुळे काँग्रेसला काय मिळू शकतं, तर दलित समाजातून येणार ग्रामीण महाराष्ट्रातलं आक्रमक महिला नेतृत्व! लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ३३% जागा राखीव ठेवणार विधेयक मंजूर झाले २०२९ च्या निवडणुकांमध्ये महिला विधेयकाची अंमलबजावणी होईल असं बोललं जाते. थोडक्यात काय तर पुढची पाच ते दहा वर्ष प्रत्येक पक्षाकडे आक्रमक भूमिका मांडणारं तरुण नेतृत्व असणार हे गरजेचं ठरणार आहे. त्यातही प्रणिती शिंदे या महिला आणि दलित अशा दोन्ही स्तरांवर काँग्रेसला अच्छे दिन आणणारा चेहरा निश्चितपणे ठरू शकतात.
कोल्हापुरचे खंबीर-गंभीर ‘आ. सतेज उर्फ बंटी पाटील’
बंटी पाटील हे नाव आजवर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणापुरतं मर्यादित ठरत होते. धनंजय महाडिकांना विरोध म्हणून बंटी पाटील यांचे नाव माध्यमांमधून चर्चेत असायचे, पण भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीची गरज ओळखून गेल्या दोन ते चार वर्षात बंटी पाटलांनी कोल्हापूरच्या बाहेर लक्ष द्यायला सुरुवात केली. आजही काँग्रेस नेत्यांकडे मनी आणि मसल पॉवर नसल्याच्या टीका होत असतात. पण अशावेळी प्रत्यक्ष मैदानात मनी आणि मसल पॉवर घेऊन विरोध करणारे नेते म्हणून बंटी पाटलांचं नाव आघाडीवर घ्यावं लागतं. त्यातही बंटी पाटील हे पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात न येणारे मराठा संस्थात्मक राजकारणाचा पाया असणारे काँग्रेसचे वारसा असणारे नेते..! सतीश पाटलांमुळे काँग्रेसला पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली-सातारा-कोल्हापूर पट्ट्यामध्ये जुन्या काँग्रेसची जी काही मत होती ती पुन्हा आपल्याकडे खेचून घेणं शक्य होऊ शकत. यशवंतराव चव्हाण हे वैचारिक संयमीत अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखलं जातं. पृथ्वीराज चव्हाण या पॉकेटचे प्रतिनिधित्व करतात. मात्र दुसरीकडे याच पट्ट्यातलं राजकारण हे वसंतदादा पाटलांप्रमाणे दबंग मसल पॉवर असलेल्या नेत्यांचं म्हणूनही ओळखलं जात. अशावेळी स्थानिक पॉकेट्सच्या सर्व सगळ्या अडचणी मिटवणारा नेता म्हणून बंटी पाटलांना यश मिळू शकत. शिवाय त्याचा काँग्रेसला सुद्धा मोठा फायदा आगामी काळात होऊ शकतो.
मराठवाड्यातील मराठा नेतृत्व ‘आ. अमित देशमुख’
स्व. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आ. अमित देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या शक्यता आता मागे पडल्याचं बोललं जाते. अमित देशमुख हे मराठवाड्यातलं मोठं नाव त्यातही ते मराठा आणि त्यातही देशमुख साहजिकच आघाडीवरच्या प्रस्थापित मराठ्यांचे नेतृत्व अमित देशमुख यांच्या स्वरूपात काँग्रेसला मिळतात. मात्र अमित देशमुख हे नाव गेल्या आठ दहा वर्षात म्हणावं तसं गाजलेलं नाहीये. त्यांना देखील मराठवाडा सोडून लातूर सोडून काँग्रेसने त्यांचा चेहरा होण्याच्या दिशेने विशेषत प्रयत्न केल्याचं दिसत नाहील. याउलट अशोक चव्हाणांचे नेतृत्व स्वीकारून आपल्यामागे संदिगता ठेवण्याचं काम हे त्यांनी केलेलं दिसतं. मात्र अमित देशमुख यांना आता ती संधी मिळतेय. अशोक चव्हाण मराठवाड्यातनं मराठा नेतृत्व म्हणून समोर येण्याचा पर्याय अमीत देशमुख यांच्यासमोर खुला असलेला दिसतो. त्यातच वडिलांचा वारसा आणि वडिलांना मानणारा जुना वर्ग या गोष्टींची पुन्हा सांगड जोडून अमित देशमुख आपले राजकीय वर सुद्धा वाढवू शकतात आणि त्याचाच फायदा निश्चितपणे काँग्रेसला होऊ शकतो.
शिक्षण सम्राट संयमीत ‘आ. विश्वजीत कदम’
गेल्या काही दिवसांमध्ये विश्वजीत कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता या बोलून दाखवल्या जायच्या. मागील वर्षी पुण्यातला एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडतानाचा विश्वजिय कदम यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांचे सासरे अविनाश भोसले हे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर कदम सुद्धा कधीही भाजप सोबत जाऊ शकतात असं बोललं जात होतं. शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थेतून मिळणारी आर्थिक रसद हा विश्वजीत कदम यांचा पाया असल्याने भाजपकडून अडचणी निर्माण करण्याचे सत्र विश्वजीत कदम यांच्या बाबतीत अमलात येऊ शकतात. २०१९च्या विधानसभेमध्ये सुद्धा विश्वजीत कदम यांच्या विरोधात उमेदवार न देऊन भाजपने त्यांना पास दिला होता असं सांगण्यात येतं. इतकं सगळं असूनही विश्वजीत कदम काँग्रेससाठी एक आशेचा किरण ठरू शकतात. त्याचं कारण म्हणजे त्यांचा संयमीत राजकारण.! महाराष्ट्र काँग्रेसच्या पारंपारिक अशा विंगला विश्वजीत कदम यांचे नेतृत्व हे आकर्षित करू शकतात.

