प्रतिनिधी/पालिका प्रशासन : 2004 सालापर्यंत भास्कर जाधव आणि नारायण राणे एकाच पक्षात होते शिवसेना दोघांमध्ये ना कुठले वाद होते ना संघर्ष..! कोकणापुरतं बोलायचं झालं तर नारायण राणेंच्या नंतरच शिवसेनेतलं मोठं नाव भास्कर जाधव यांचं होतं. पण 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांना मातोश्रीवर ताटकळत ठेवण्यात आलं आणि भास्कर जाधव चांगलेच नाराज झाले. उद्धव ठाकरेंवर आरोप करून त्यांनी शिवसेना सोडली. 2005 मध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप करूनच शिवसेना सोडली. भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेले तर नारायण राणे काँग्रेसमध्ये, दोघांच्या वाटप बदलल्या आणि नाराजीची बीज पेरली जायला सुरुवात झाली. कारण 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचे तिकीट कापण्यामागे नारायण राणे होते असे चर्चा रंगली. कोकणात भास्कर जाधव यांच्या ताकदीला चौकट टाकण्यासाठी राणेंनी हा डाव खेळला असेही बोलले गेले. आणि ‘राणे विरुद्ध जाधव’ सुप्त संघर्ष सुरू झाला. 2009 साली राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये भास्कर जाधव राष्ट्रवादीकडून राज्यमंत्री होते. तर नारायण राणे काँग्रेसकडून मंत्री त्यावेळी शिवराम दळवी, किरण पावसकर असे राणे समर्थक भास्कर जाधव यांच्या मध्यस्थेमुळे काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले असे चर्चा सुरू होती. नारायण राणेंनी भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात दौरा काढला, पक्ष वाढीसाठी असलेल्या या दौऱ्यात नारायण राणेंनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. निलेश राणेंनी हीच टीकेची दोरी पुढे ओढत संघर्ष चालवला. या दौऱ्या वेळी राष्ट्रवादीतले प्रवेश आणि टीका हाच प्रकार घडत गेला आणि कोकणातला तणाव वाढला. आघाडीच्या नेत्यांनी या दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण थांबण्याऐवजी तो वाढतच गेला. 2011 मध्ये हा वाद फक्त टीकांपुरताच मर्यादित राहिला नाही तर रस्त्यावर येऊन पोहोचला. याचं कारण ठरलं भास्कर जाधव यांचा एक भाषण!
भास्कर जाधव यांचे मित्र विजय गुजर यांच्या मेडिकलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिपळूण मध्ये होता. त्यावेळी भाषण करताना भास्कर जाधव यांनी मी शेठ आहे कोंबडी चोर नाही असं वक्तव्य केल्याची चर्चा झाली. आणि वादाची ठिणगी नेमकी येथेक्सग पडली. भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना उद्देशून कोंबडी चोर शब्द वापरलेला नाही, लोकांमध्ये असलेल्या कुणीतरी हा शब्द उच्चारला, माझं नारायण रावण सोबत याबद्दल बोलणं झालं आहे असं सांगितलं. पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं नारायण राणे यांचे चिरंजीव तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या समर्थकांनी भास्कर जाधव यांचं कार्यालय फोडलं कार्यालय फोडत असताना खासदार निलेश राणे स्वतः तिथे उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांनी निलेश राणेंवर गुन्हा हि दाखल केला. निलेश राणेंना अटक होणार का? अशी चर्चा असतानाच भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचा कार्यालय फोडलं राणेंचा पुतळा जळला आणि कोकणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत होते दोन्ही नेत्यांकडे मंत्री पद होते. विशेष गोष्ट म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीवर मी निलेश राणेचा काका आहे तो माझा पुतण्या आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनीच निलेश राणेंच्या प्रचारात जोर लावला होता. पण कोंबडी चोराच वक्तव्य झालं आणि राणे समर्थकांनी जादा समर्थक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मनसरेकर यांच्या घरावर दगडफेकळी केली. साहजिकच आघाडीतले दोन मित्र पक्ष भांडत असल्याचे चित्र सगळ्या राज्यात निर्माण झालं. अनेक वरिष्ठ नेत्यांना यामध्ये मध्यस्थीत करावी लागली पण राडा सुरू झाला होता. त्यानंतर भाषण छोट्याखाली कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी नारायण राणे किंवा त्यांची मुलं भास्कर जाधववांवर टीका करायची संधी सोडायचे नाहीत. 2015 मध्ये तुरुंगाव गावात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या त्यानंतर झालेली ग्रामसभा उधळून लावण्यात आली. निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांना आणि काही ग्रामस्थांना मारहाणही झाले. या प्रकरणात भास्कर जाधव यांचा मुलगा आणि भाऊ यांचे नाव पुढं आलं. भास्कर जाधव यांनी हे घरगुती प्रकरण असल्याचं सांगितलं खरं, पण निलेश राणेंनी या वादावरून भास्कर जाधव यांच्यावर आरोप केले वाळूच्या व्यवहारातून पैसा कमावला घरात गुंड तयार केले अशा त्यांच्या आरोपांमुळे कोकणात पुन्हा एकदा राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव असे चित्र उभे राहिलं.
2019 मध्ये भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा राणे भाजपमध्ये आले होते. दोन्ही पक्ष युतीत होते तोवर वातावरण शांत होत. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सामील झाले आणि राणे जाधव पुन्हा एकदा राजकीय विरोधक बनले. कोकणात वर्चस्व कुणाचं यामुळे सुरू झालेला त्यांचा वाद पुन्हा वैयक्तिक झाला राणे पिता पुत्रांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करणे सुरू ठेवलं. तर भास्कर जाधव यांनी कधी 25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो लावलेल्या छायाचित्र प्रदर्शित केलं. आणि, याला उत्तर देताना राणे समर्थकांनी भास्कर जाधव यांना शोधून आणा आणि अकरा रुपये बक्षीस मिळवा असे बॅनर मुंबईत लावले. जाधव यांनी राणे यांचे नक्कल केली तर राणेंनी भास्कर जाधव माझ्याकडून प्रचारासाठी 15 लाख रुपये घेऊन गेले असा आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या कोकणातल्या जनसंवाद यात्रेत भाषण करताना भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांवर कौटुंबिक पातळीवर टीका केली. आणि त्यानंतर लगेचच हिशोब चुकता करायला येतोय असं म्हणत निलेश राणे यांनी गुहागर मध्ये सभा घेणार असल्याचे सांगितलं. त्यात सभेसाठी येताना संध्याकाळी ज्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि तोडफोड अश्रूधूर कारवायांनी, कोकणाच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा राजकीय राडा बघायला मिळाला. जो उभ्या महाराष्ट्राने अनुभवला..!

