1–2 minutes

नवी मुंबई/पालिका प्रशासन : सीबीडी सेक्टर-८ येथील श्री शिव साई मंदिराचा ३०वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी, दोन दिवसीय (13 & 14 Feb.) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांतर्गत, पनवेल स्थित साईबाबा गुरुनारायण मंदिरातील साईभक्त आशा व रेश्मा यांच्याकडून गुरुनारायण कथावाचन करण्यात आले, तर संध्याकाळी साईपालखी व तदनंतर माधवबाग हृदयविकार क्लिनिक आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी शशिकांत शेंनॉय, सुमन शेणॉय आणि विष्णू सोनी पार्टी यांचे भजनसंध्याची आयोजन मंदिराच्या प्राणांगणात संपन्न झाले. वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले ज्याचा लाभ मोठ्याप्रमाणात साईभक्तांनी घेतला. तर साईमंदिराचा ३० वा वर्धापन प्रसन्न आणि भक्तिमय अश्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याने श्री शिव साई मंदिर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. जयाजी नाथ आणि खजिनदार रमेश शेट्टी यांनी समस्त साईभक्तांचे आदरपूर्वक आभार मानले. मंदिरातील कार्यक्रमांना बातम्यांचा माध्यमातून नागरिकांपर्यँत पोहचविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र टाईम्सच्या ज्येष्ठ महिला पत्रकार मनीषा ठाकूर-जगताप, जनता न्युज हिंदी चॅनलच्या संपादिका दिपाली घोलप यांचा सत्कार मंदिरातर्फे करण्यात आला. सदर वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य अंकुश कोकाटे, अनंत पेडणेकर, लक्ष्मण कोठेकर, एम. एम. भार्गव, प्रमोद नाडकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, पत्रकार सुदिप दिलीप घोलप, पालिका प्रशासन वृत्तसमुहाचे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व रणदिवे, साईश मढवी इत्यादीं आणि श्री सिद्धिविनायक इव्हेन्टचे निलेश कदम व साईचक्र कॅटेरर्सचे हरीश शेट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Design a site like this with WordPress.com
Get started