1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : आमदार, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असा प्रवास करणारे आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ राजकीय नेते अशी ओळख असणारे लोकनेते ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेचे उमेदवार म्हणून भाजपच्या केंद्रीय निवड समितीमध्ये पसंतीचे ठरत आहे. त्यामुळे, लोकनेते गणेश नाईक लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे लोकसभा युती सरकारमध्ये बहुतांशवेळा शिवसेनेला आंदण देण्यात आला. मात्र, आताची राजकीय परिस्थिती पाहता ठाणे लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीकडे अनुभवी, थेट जनसंपर्क असणारा ज्येष्ठ नेता म्हणजे एकमेव गणेश नाईक आहेत. आ. गणेश नाईक यांचे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि इतर जनविधायक कार्ये पाहता, दादा नाईकांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास नवी मुंबई आणि मीरा भाईंदर क्षेत्रातून एकतर्फी मतदान प्राप्त होऊ शकते. तर, ठाणे क्षेत्रातून पन्नास टक्के मतदान होवू शकते.

तसेच, दादा नाईकांचे कामगार क्षेत्रातील पकड, प्रकल्पग्रस्त – भूमीपुत्रांचे नेते आणि अल्पसंख्याक समाजात असणारे पारिवारिक पद्धतीचे संबंध यामुळे गणेश नाईक यांस ठाणे लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिल्यास विरोधी पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, दादा नाईक केंद्रात पोहचल्यावर ठाणे लोकसभेला पहिल्यांदा केंद्रीय पदाचा लाभ नाईक यांच्यामार्फत मिळू शकतो.


Design a site like this with WordPress.com
Get started