प्रतिनिधी/पालिका प्रशासन : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे पनवेल खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगा ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याचा शुभारंभ संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाच्या प्राचार्या सानवी देशमुख, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ, प्रथम दिवस व्याख्यानकर्ते मुंबई उच्चन्यायालयाचे ज्येष्ठ ऍड. दिलीप शिंदे, ऍड. विनायक कोळी इत्यादी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
सदर व्याख्यानमाला २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून, या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ वकील दिलीप शिंदे, दुसऱ्या दिवशी (२९ जानेवारी) महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट गजानन चव्हाण, तिसऱ्या दिवशी (३० जानेवारी) मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, चौथ्या दिवशी (३१ जानेवारी) डॉ. डी.वाय. पाटील लॉ स्कुलच्या संचालिका डॉ. करुणा मालविया, पाचव्या दिवशी (१ फेब्रुवारी) MNLU मुंबईचे सेवानिवृत्त रेजिस्ट्रार डॉ. अनिल वारीअथ आणि पाचव्या दिवशी HVPS लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मधुरा कळमकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
तर, आयोजित व्याख्यानमालेस बीसीटी लॉ कॉलेजसहित इतर लॉ कॉलेजचे विधीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच सदर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, स्थानिक दिवाणी न्यायालयात कार्यरत वकील इत्यादी आपली उपस्थित दर्शवणार आहेत.

