प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रातील तरुण चेहरा आणि प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे ठाणे लोकसभेची जागा लढवण्यास उत्सुक असून, याबाबत त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
1952 पासून अस्तित्वात असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात याआधी तब्बल 5 वेळा काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. 1984 च्या निवडणुकी शांताराम घोलप यांच्या विजयानंतर या मतदार संघातून काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाहीए. ज्यामुळे, कधीकाळी कोकण पट्ट्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभेतून काँग्रेस पक्षाला अधोगती लागली. मात्र, अनिकेत म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या मागणी दाव्यामुळे, पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
तर, मागील वर्षी “काही तरी कर नवी मुंबईकर” या जनजागृती व लोकहितवादी उपक्रमातून अनिकेत म्हात्रे यांनी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व इतर नागरी समस्यांबाबत थेट जनतेमध्ये जाऊन त्याविषयी माहिती घेतली व महापालिका आयुक्तांच्या समोर मांडणी करून लेखी निवेदनाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठीची मागणी केलेली आहे.
त्यामुळे, गेली दहाहून अधिक वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत असणाऱ्या अनिकेत म्हात्रे यांनी ठाणे लोकसभेवर काँग्रेसकडून दावा ठोकल्यामुळे एकप्रकारे कॉंग्रेसच्या कार्यकर्ते यासोबतच मतदारांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.

