नवी मुंबई/पालिका प्रशासन : राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर राणी आणि राजवाडे मतदारांनी इतिहासजमा केले आहेत. लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असतात, त्यांनी उगाच स्वतःला अतिउच्च समजून मतदार राजाचा रोष ओढवून घेवू नये. अन्यथा, ‘राणी’पुत्राला राजकीय किंमत मोजावी लागेल.
बुद्धिबळाच्या खेळात सर्वांची एकजूट महत्वाची असते. एखादा प्यादा शत्रूच्या घरात पोहचून आपल्या कोणा शक्तिशाली सहकाऱ्याला पुन्हा प्रवेश करवून देतो. तर बुद्धिबळातील हत्ती, उंट, घोडा हे या या खेळातील मार्यदित नियमावलीनुसार वाटचाल करतात. परंतु, राजकारणातील प्राण्यांना व प्याद्याना कोणत्याही प्रकारची भीती व नियम नसतात. त्यामुळे, कोण कोणत्या वेळेस ‘राणी’चा राजकीयदृष्ट्या कार्यक्रम करेल याबाबत साशंकता आहे.
तसेच, लोकप्रतिनिधीने जनतेसाठी सकारात्मकतेने कार्यरत राहणे आवश्यक असताना, ज्यांच्या जीवावर अर्थात मतदानावर विराजमान आहात त्या मतदारांना रद्दी समजून स्वतःला ‘राणी’ची उपाधी देणे म्हणजे लोकशाहीला काळिमा फासने, असे बोलल्यास वावगे ठरू नये. बाकी सर्व गोवर्धनी माता जाणून आहे.

