प्रतिनिधी/पालिका प्रशासन : शिकाऊ चालक असणाऱ्याना पक्के ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी पनवेल MH46 RTO कडून ओबडधोबड आणि बांधकाम साहित्यामुळे खराब असणाऱ्या रस्त्यावर घेत आहेत. ज्यामुळे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षित, गतिमान आणि पारदर्शक संकल्पनेला नख लावण्याचे कुकर्म पनवेल RTO विभागामार्फत होत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे.
बागेश्वर धाम श्री वीरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवसीय अध्यात्मिक दरबार पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे. याचसमोरच्या डांबरी रस्त्यावर पनवेल RTOकडून ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. मात्र, कार्यक्रमामुळे चाचणीसाठी येणाऱ्यांना न कळवताच पनवेल RTOने सदर चाचणी खांदेश्वर येथे किया मोटर्स शोरूमच्या मागील रस्त्यावर ठेवली. या रस्त्यावर बांधकाम साहित्य व माती विखुरलेली असल्याने चाचणी देण्यासाठी आलेल्या दुचाकी व चारचाकी स्वरकांना विनार्थकपणे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच, चाचणीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड असतानाही, येथे उपस्थित RTO विभागाचे अधिकारी पुन्हा सर्व कागदपत्रांची प्रत जमा करून घेत होते. तर, अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती एजंटचा विळखा थेट चाचणीसाठी येणाऱ्यांना अडथळे निर्माण करत होता.
तर, आरटीओमध्ये नागरिकांची कोणतेही काम होत नाही. सगळीकडे दलालांचा विळखा पडलेला आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी पैसे घेतले जातात. आता या खात्याची अधिक उपयुक्तता राहिली नाही. यावर आधीच शिक्कामोर्तब असताना, असुरक्षित रस्त्यावर ड्राइव्हिंग चाचणी घेणे नागरिकांच्या जीवावर बेतल्यास अथवा कोणी जखमी झाल्यास त्याची जबाबदारी RTO mmh-46 विभाग घेईल का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.



