प्रतिनिधी/पालिका प्रशासन : राज्य शासन आणि नवी मुंबई महानगरपालिका संबंधित सिवुड्स विभागातील नागरी समस्या, सेवा – सुविधांच्या समस्यांचे निराकरण प्रशासकीय स्तरावर गतिमानतेने व्हावे. याकरिता स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी आता थेट लोकनेते आ. गणेश नाईक यांनाच साकडे घातले असून, सिवुड्स विभागातील नागरी समस्या लवकरात लवकर मार्गी लागतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी आ. गणेश नाईक यांची भेट घेत त्यांसमोर सिवुड्मधील महानगरपालिका आणि राज्य शासन निगडित नागरी सुविधांबाबतचे विषयांची मांडणी केली. ज्यामध्ये, सिवूड्स मधील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता असलेली किमान मर्यादा 30 वर्षाऐवजी 25 वर्षे करणे; सेक्टर 50 जुने ते डी पी एस शाळेपर्यंत अंडर पास किंवा उड्डाणपूल बनवणे; सिवड्स विभागासाठी पार्किंग आणि मार्केटच्या भूखंडाची तरतूद करणे.;सेक्टर 50 जूने येथील जॉगिंग ट्रॅक, सिव्हीक सेंटर बनविण्यासाठी सिडको तथा MCZMA ची परवानगी, इत्यादी विषय आ. गणेश नाईक यांसमोर मांडले. याप्रसंगी विभागातील बी.डी. बागुल, श्रीकांत पवार, सौ. तबस्सुम, अक्षय जाधव, प्रमोद उबाळे व विभागातील इतर प्रतिष्ठित नागरिक डोळस यांसोबत उपस्थित होते.

