प्रतिनिधी/पालिका प्रशासन : राजकारणाच्या मार्गातून समाजसेवा करणाऱ्याला विरोधक आणि आप्तस्वकीयांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी, नियती योग्यच न्याय करते. हेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी ज्येष्ठ लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या ऐरोली विधानसभा मतदार संघातून सुरु होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ प्रारंभ सिद्ध करत आहे.
लोकनेते आ. गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षात राज्यातून आणि थेट दिल्लीतून पाठबळ असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असायची. परंतु, उद्या २७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात लोकनेते आ. गणेश नाईक प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐरोली मतदार संघातून होत असल्याने दबक्या राजकीय पाठबळ चर्चेवर आता शिक्कमोर्तब झाले आहे. तर, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व त्याचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचून दिला जाणार आहे. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध योजनांचा समावेश आहे.
शासनामार्फत डिजीटल स्क्रिन असलेली सुसज्ज व्हॅन या करिता महानगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात येत असून भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ हे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान व्यापक स्वरुपात राबविले जात आहे. यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा यादृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर प्रयत्न केले जात आहे.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या उपक्रमासाठी शासनाकडून उपलब्ध करुन दिल्या जाणा-या जनजागृतीपर प्रचार वाहनाचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल –
दि. 27 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – दिघा तलाव (हिंदमाता विद्यालय)
दि. 27 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – दिघा विभाग कार्यालय
दि. 28 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – नमुंमपा शाळा, यादव नगर
दि. 28 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – ऐरोली गावदेवी मंदिराजवळ
दि. 29 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – इच्छापूर्ती गणेश मंदिर, से.15, ऐरोली
दि. 29 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – ॲपल हॉस्पिटल जवळ, से.8, ऐरोली
दि. 30 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – ऐरोली विभाग कार्यालय
दि. 30 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – नमुंमपा शाळा क्र.55 आंबेडकर नगर, रबाळे
दि. 31 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – सिडको मैदान, गोठिवली
दि. 31 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – नमुंमपा मैदान से.06 घणसोली

