प्रतिनिधी (नवी मुंबई) : बहुप्रतिक्षित अश्या दोन दिवसीय सिवूडस स्पोर्टस फेस्टिव्हलची सुरुवात शनिवारी 23 तारखेला सकाळी 7 वाजता नवी मुंबई महापालिका मुख्यालय बेलापूर येथून मेरेथॉनने होणार असून, डीएव्ही शाळेच्या मैदानावर सकाळी 8 वाजता लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक, महापालिका क्रीडा उपायुक्त तथा माजी कप्तान भारतीय कबड्डी संघ अभिलाषा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत फेस्टिव्हलचा प्रारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर, फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिवूडसच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सिवूडस स्पोर्टस फेस्टिव्हलचे आयोजक माजी नगरसेवक विशाल डोळस व आयोजन समितीच्या सदस्यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत विशाल डोळस यांच्या समवेत, विनोद कोटीया, वेदांत शिर्के, रमेश काऊंडर, अक्षय मुसळे, सतीश कडू, संजय कदम, सुशांत काळे, रमल मोरे इत्यादी आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी, गतवर्षीच्या विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
सिवूडस स्पोर्टस फेस्टिव्हलचे हे दुसरे पर्व असून, सालाबादप्रमाणे यावेळीही बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, महिलांसाठी बॉक्स क्रिकेट तसेच नव्याने टग ऑफ वॉर, क्रॉसफीट सारखे आधुनिक क्रीडाप्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे.
तर, मेरेथॉनसाठी वय 8 ते 65 वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. तर, इतर क्रीडा प्रकरांसाठीचे पकडून एकूण 800 नागरिकांनी या क्रीडा महोत्सवात नोंदणीद्वारे आपला सहभाग दर्शविला आहे. सकाळी 7 वा. सुरू होणारी मॅरेथॉन 5 किलोमीटरचे अंतर कापून डी.ए.व्ही. शाळा सिवूडस येथे संपणार आहे. तर, शनिवारी इतर क्रीडा स्पर्धा सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आणि रविवारी सकाळी 8 ते 6 रात्री पर्यंत व तदनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


