1–2 minutes

पनवेल/पालिका प्रशासन : देशाच्या संविधानिक पदाचा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाची संस्कृती बनली आहे, असी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज(दि. २१) निषेध आंदोलनावेळी केली. संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या इंडीया आघाडी आणि त्यांना साथ देणाऱ्या उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘उपराष्ट्रपतीजी का अवमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा गगनभेदी घोषणा देत इंडीया आघाडीने देशाची माफी मागावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

संसद भवनाच्या पायऱ्यांवर मंगळवारी विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची नक्कल केली होती. यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते. यामुळे देशाच्या संविधानिक पदाचा अवमान करणाऱ्या इंडीया आघाडी आणि त्यांना साथ देणाऱ्या उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली.  भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, विकास घरत, माजी नगरसेविका रुचीता लोंढे, शहर खजिनदार संजय जैन, युवामोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे सहसंयोजक रमेश नायर, कोकण विभागाचे संयोजक गणेश शेट्टी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील,  उत्तर भारतीय प्रकोष्ठचे संयोजक संतोष शार्मा,  जितेंद्र तिवारी, अभिषेक भोपी, युवानेते सतीश पाटील, केदार भगत, विनोद वाघमारे, प्रितम म्हात्रे, रुपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, विश्वजीत पाटील, सुहासिनी केकाणे, आरती तायडे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started