प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे येथील विजेत्यांना थेट विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळत असल्याने यामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू घडताना दिसून येत आहे.यामध्ये विशेष म्हणजे सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात नमुंमपा शाळांतील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त केलेले आहे. आजतागायत कबड्डी, खो-खो या खेळापर्यंत सिमीत असलेल्या क्रीडा प्रकारांत आता फुटबॉल, बॉक्सींग, तायक्वाँदो, कॅरम, बुध्दीबळ, रायफल शुटिंग, कुस्ती अशा विविध खेळांचा समावेश झाल्याने त्यामध्ये नमुंमपा शाळांतील खेळाडूंनी सहभागी व्हावे यादृष्टीने क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विशेष लक्ष देत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धा दि. 22 नोव्हेंबर,2023 रोजी वारकरी भवन, से-3, सी.बी.डी.बेलापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षाआतील वयोगटामध्ये 450 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना त्यांनी नवी मुंबई शहरात आता अत्यंत चांगल्या सुविधा व प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत आहेत, त्याचा जास्तीत जास्त लाभ खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन करतानाच आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने नवी मुंबईतील खेळाडू भाग्यवान आहेत, असे मत व्यक्त केले.सुसज्ज आणि सुविधायुक्त हॉल आणि योग्य मॅटवर स्पर्धा होत असल्याचे नमूद करीत विशेषत: तायक्वाँदोसारख्या खेळामध्ये मुलांच्या बरोबरीने मुलींसुध्दा मोठया प्रमाणात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते. या स्पर्धाच्या आयोजनासाठी तायक्वाँदो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व पंचांचेही मोलाचे योगदान लाभले.या स्पर्धेत नमुमंपा महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणे येथील मुलामुलींनी सर्वाधिक पदके पटकाविली असून त्यामध्ये 11 सुवर्ण, 16 रौप्य व 13 कांस्य पदके पटकाविण्याची अत्यंत अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे. यामध्ये – देवयानी हिरवे, निकिता राठोड, स्वरा कांबळे, श्रेया शेलार, शेजल कंक, काजल ढाकरगे, नंदिनी चव्हाण, आयुष लिघांटे, आर्यन दिंडे, वैभव गुंजाळकर, आर्यन निकम यांनी सुवर्णपदक; जानवी भारती, आदिती खबुले, तनिषा वांगडे, श्रावणी उबाळे, श्रध्दा खाटपे, दुर्वा वांगडे, सीमा राठोड, श्रावणी शेलार, करिश्मा चव्हाण, खुशी विश्वकर्मा, जयश्री जाधव, दिलशान भालेराव यांनी रौप्यपदक तसेच चैत्रा इजेरी, ममता मोहिते, साक्षी राऊत, सारिका अंभोरे, सानिका हिरवे, मनिषा राऊत, समृध्दी पाटील, चैताली मांढरे, पुनम पवार, आकाश यमकर, अरविंद पत्तार, अक्षय ढवळे, आदित्य हिरवे, अथर्व कांगणे, मानव मुलगे, बु्ध्दम सरवदे यांनी कांस्यपदक संपादन केले आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शिक्षण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी, अरुणा यादव, विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली संख्ये, सहशिक्षक प्रशांत गाडेकर, ज्ञानेश्वर घुगे, वर्षा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

