प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सिबीडी पोलीस ठाणे नवी मुंबई गुरनं. २१८/२०२३ भादंवि कलम ४५४,३८०,३४ या गुन्हयातील अज्ञात आरोपीनी फिर्यादीच्या घरातून २०६ ग्रॅम वजनाचे सोने व १०,०००/- रू रोख रक्कम असा एकूण ८.३२,०००/- रूचा ऐवज दिवसा घरफोडी करून पसार झाले होते. सीबीडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदरील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून सुमारे २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत यातील आरोपी निष्पन्न केले, आरोपींचा नाशिक, शिर्डी, सातारा, कोल्हापूर, पुणे व पालघर परिसरात शोध घेवून ते गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना दि. २८/११/२०२३ रोजी महाराष्ट्र गुजरात सीमेवर अच्छाड ता. तलासरी, जि. पालघर येथून अटक केली आहे.
नमूद आरोपींना सदरील गुन्हयात अटक करून त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी सीबीडी, खारघर, नेरूळ व मालवणी परिसरात केलेले घरफोडी, ऑटोरिक्षा चोरी व लॅपटॉप चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडीकस आले आहेत.
अटक आरोपीची नावे –
१) सददामहुसेन जमालुददीन खान वय ३५ वर्षे, रा. रूम नं. ३०१, दत्ताकृपा अपार्टमेंन्ट, अभयनगर, कोपरकर
शिळरोड, शिळफाटा, ठाणे
२ ) निलेश राजू लोंढे वय २२ वर्षे रा.मनिष चाळ, चुनाभटदी, मुंबई
३) संजय रत्नेश कांबळे वय ४२ वर्षे रा. डी ५/७०४, निर्मलनगरी, खर्डीगाव, दिवा, ठाणे
४) गुडडू रामधनी सोनी वय ३९ वर्षे रा. घर नं. १९, चाळ नं. २०, उज्वला रघूनाथ शेवडे यांचे घर, रमाबाई
आंबेडकरनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई
) विक्की राजू लोंढे वय २० वर्षे रा. मनिष चाळ, हनुमान मंदीरजवळ, चुनाभटट्टी, मुंबई
५
उघडकीस आलेले गुन्हे –
१) २) खारघर पोलीस ठाणे गुरनं. ३७९/२०२३ भादंवि कलम ३७९
सिबीडी पोलीस ठाणे गुरनं. २१८/२०२३ भादंवि कलम ४५४,३८०,३४
३) नेरूळ पोलीस ठाणे गुरनं. ५२२/२०२३ भादंवि कलम ३७९
४) मालवणी पोलीस ठाणे, मुंबई शहर गुरनं. १४२६/२०२३ भादंवि कलम ३७९
जप्त मुदद्देमाल –
१) ८,२२,०००/- रू किंमतीचे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे २) ३०,०००/- आय फोन ११ प्रो मॅक्स, IMEI NO. 35390510186368933
३) ५०,०००/-रू किंमतीची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटोरिक्षा क. MH 47 X 9884 इंजिन नं.
AZYWJL35914 चेसिस नं. MD2A27AY4JWL61557
४) ००.००/- एक १८ इंच लांबी व २.५ इंच व्यास असलेली लोखंडी कटावणी.
एकूण ९,१२,०००/-
अटक आरोपीचा गुन्हे अभिलेख
१) आरोपी सदद्दामहूसेन जमालुदद्दीन खान याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाणेत १२ गुन्हे दाखल आहेत २) आरोपी निलेश राजू लोंढे याचेवर वेगवेगळया पोलीस ठाणेत १४ गुन्हे दाखल आहेत
३) आरोपी संजय रत्नेश कांबळे याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाणेत ०९ गुन्हे दाखल आहेत
४) आरोपी गुडडू रामधनी सोनी याचेवर वेगवेगळया पोलीस ठाणेत ०७ गुन्हे दाखल आहेत
५) आरोपी विक्की राजू लोंढे याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाणेत ०१ गुन्हा दाखल आहे.
वरील उल्लेखनिय कामगिरी मा.श्री. मिलिंद भारंबे साो पोलीस आयुक्त नवी मुंबई, मा. श्री. विवेक पानसरे पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१ वाशी, मा.श्री. राहूल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त तुर्भे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. गिरीधर गोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिबीडी पो. ठाणे, मा.श्री. हनीफ मुलाणी पोलीस निरीक्षक गुन्हे, सिबीडी पो, ठाणे यांचे देखरेखीत सिबीडी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि श्री. सुरेश डांबरे, पोउपनि श्री. विष्णू वाघ, पोहवा/१३२१ पाटील, पोहवा/९६८ पठाण, पोहवा/१५८३ भोकरे, पोना/१८१४ फड, पोना / २९३३ बंडगर, पौना/२६९० वाघ, पोना / ३१२५ साबळे, पोशि/ ३२४१ पाटील, पोशि/ ३४४० पाटील यांनी केली आहे.

