1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर / भूखंडावर अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत आहे. सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याने टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग, अनधिकृत बांधकामे विभागाच्या मार्फतीने दिनांक 28/11/2023 रोजी रात्रौ सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवून, खारघर व उलवे या ठिकाणी असलेल्या मोकळया जागेत / रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे डेब्रीजचे डंपर खाली करीत असताना एकुण 02 डंपर्स मिळून आले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

डंपर क्रमांक MH-43-BX-7121 वरील चालक सुरेश मानु आडे, वय 37 वर्षे, हा खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राडारोडा (डेब्रीज) टाकतांना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 422/2023 कलम भा.दं.वि.सं.क. 269, 511 अन्वये दिनांक 28/11/2023 रोजी गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली.

डंपर क्रमांक MH-46-CL-2787 वरील चालक सुर्या चेनु वार्या, वय 29 वर्षे, व क्लीनर अमोल गणेश येडे, वय 32 वर्षे हे एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राडारोडा (डेब्रीज) टाकतांना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 344/2023 कलम भा.दं.वि.सं.क. 269, 511 अन्वये दिनांक 29/11/2023 रोजी गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली.

डंपर क्रमांक MH-46-BM-1878 वरील चालक याने खारघर सेक्टर 33 येथील रस्त्यावर डेब्रीज टाकल्याने त्याच्या विरुध्द खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 424/2023 कलम भा.दं.वि.सं.क. 269, 511 आणि मोटार वाहन अधिनियम 1954 चे कलम 134 B अन्वये दिनांक 29/11/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या http://www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started