प्रतिनिधी/पालिका प्रशासन : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाच्या निमित्ताने दिनांक ७ ते १० डिसेंबर रोजी इंद्रप्रस्थ नगर, डी. डी. ए. मैदान दिल्ली येथे अभाविपचे ६१वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होणार आहे. अभाविप महाराष्ट्रातील शिवस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यावरील मातीचा कलश हिंदवी स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अभाविपचे २० कार्यकर्ते बाईक रॅलीच्या दिल्ली पर्यंत घेऊन जाणार आहेत. या रॅलीच्या मार्गामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली या ४ राज्यातील ३४ प्रमुख शहरामध्ये शिवचरित्रावर व्याख्याने आयोजित केली गेली आहेत.
देशाचा अमृत काळामध्ये स्वतःचे आरमार, स्वतःचे चलन, स्वतःचे गडकिल्ले, स्वतःचे राज्यशासन, स्वतःचे कारखाने उभारण्याचे शिवरायांचे कर्तुत्व आजच्या विद्याथ्यांना आत्मनिर्भरतेची प्रेरणा देते. हाच संदेश घेऊन छत्रपतींच्या राजधानीहुन हि यात्रा आपल्या देशाच्या राजधानीकडे दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्थान करेल आणि दि. ०७ डिसेंबर, २०१३ रोजी अभाविपचा राष्ट्रीय अधिवेशनस्थळी पोहोचेल.
अभाविपच्या ६९व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये हिंदवी स्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत होईल. दिल्लीत संपन्न होणाऱ्या या अधिवेशनामध्ये भारताच्या सर्व काना कोपर्यातून तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठामधून शिकणारे ८००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याच राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अभाविप आपल्या कार्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर प्रस्ताव पारित करेल. हे प्रस्ताव भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतील. अधिवेशनमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे प्राध्यापक यशवंत राव केळकर युवा पुरस्कार प्रदान सोहळा देखील पार पडेल तसेच विविध गटसः चर्चा, भाषण सन्ने आणि सेमिनार देखील पार पडतील.

