प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील उत्तर भारतीयांची वाढलेली संख्या आणि उत्तर प्रदेशात असणारी भाजपची एकहाती सत्ता व त्यातून तेथील जनतेला प्राप्त होणार लाभ या सर्वाचा एकतर्फी फायदा भाजपला आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत होणार आहे. परंतु, स्थानिक नेतृत्व उत्तर भारतीयांना किती सन्मानजनक वागणूक देते यावर सर्वकाही निर्भर आहे.
उत्तर प्रदेशात हिंदू धर्माचे कट्टर समर्थक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कामकाजाची पद्धतीमुळे तेथील व देशात उद्योग-व्यवसायामुळे पसरलेली उत्तर भारतीय जनता भाजपवर विशेष राजकीय विश्वास ठेवून आहे. असाच काहीसा फायदा नवी मुंबई भाजपला 2015 पासून सातत्याने निवडणुकीत होत आलेला आहे.
मात्र, अद्यापही उत्तर भारतीयांना येथील भाजप नेतृत्वाने हवा तसा सन्मान दिला नसून, सक्रिय राजकारणापासूनही दूर ठेवले आहे. त्यामुळे हक्काचे मतदार असूनही भाजपचे स्थनिक नेतृत्व उत्तर भारतीयांना गृहीत धरत आहे. आणि जर का असेच सुरू राहीली तर, आगामी निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांची नाराजगी भाजपला किमान 20% भागांमध्ये यशापासून दूर ठेवू शकतो.

