1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पामबीच मार्गालगत असणाऱ्या सिवूडस सेक्टर 46A याठिकाणी बांधकाम सुरू आहे. मात्र, याठिकाणी चालू असणाऱ्या खोदकाम आणि खोदकामातून बाहेर पडणारी माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहने सिवूडसच्या अंतर्गत रहदारीच्या रस्त्यावरून जा-ये करत आहेत. ज्यामुळे, सिवूडस सेक्टर 48,46, 46A या भागात राहणाऱ्या राहिवाश्याना विनार्थकपणे अवजड वाहतूक कोंडीचा त्रास व सामना करावा लागत आहे. तसेच, या अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण व धुळीमुळे नागरिकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होवू लागला आहे.

तर, दुसरीकडे शुल्लक नागरी समस्यां उदभवल्यास महापालिका वॉर्ड ऑफिस ते आयुक्त मुख्यालयांपर्यंत तक्रार करणारे सिवूडस विभागातील अनुभवी आणि तत्पर नेते व लोकप्रतिनिधी मात्र सिवूडमधील राहिवाश्याना होणाऱ्या या दैनंदिन त्रासाबद्दल मात्र मूग गिळून क गप्प आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, पामबीच मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही ही या बांधकाम साईटवरील अवजड वाहने मात्र पामबीच मार्गावर वाहतूक पोलीस विभागासोबत आर्थिक देवाणघेवाण करून बिनधास्तपणे वाहतूक करत असल्याचेही समोर आले आहे.

एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेसाठी, “निश्चय केला नंबर पहिला” या उद्देशाने शहर सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे विशेष प्रयत्नशीलपणे लक्ष केंद्रित करत आहे. परंतु, सीड्समध्ये मात्र या बांधकाम साईटमुळे होणाऱ्या रस्त्यावरील माती विखरणे व हवा प्रदूषित करण्याकडे बेलापूर वॉर्ड ऑफिस मॅनेज होत दुर्लक्ष करत असल्याची चर्चा स्थानकांमध्ये आहे


Design a site like this with WordPress.com
Get started